महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद

महाबळेश्वरसह परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून, या वर्षीच्या हंगामात ३०० इंच पाऊस झाला आहे. याबाबत ‘द वेदर चॅनेल इंडिया’ने देखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये मेघालयातील मॉसिनराम, चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. या वर्षी येथे आज पर्यंत ७६३१ मि. मि पाऊस झाला आहे.

आकडेवारीनुसार यंदा मॉसिनराम शहरात आजपर्यंत साडेसहा हजार मिमी पावसाचा टप्पा पार केला आहे. तर महाबळेश्वर शहरात साडेसात हजार मिमी पाऊस झाला आहे. तब्बल तेरा वर्षांनतर १ जुन ते ८ सप्टेंबर अखेर येथे ३०० इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे २३७ इंच पावसाची नोंद येथे झाली होती. 

 यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर शहराची नोंद झाली आहे.सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजी ओळखले जाते. महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी पातळी वाढते तर चिपळूण, महाडसह कोकणातील काही भागावर या पावसाच्या पाण्याचा परिणाम होतो.

Review