गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या - राज ठाकरे
मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका. जर उत्पन्नच हवे असेल तर
गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) २५ किल्ल्यांची यादी करण्यात आली असून हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाण्याची शक्यता असल्याच्या वृत्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी(दि.७) डोंबिवलीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली,
ठाकरे म्हणाले कि, “महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे. मात्र सरकारला याचं काही देणंघेणं नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनेबाबत त्यांना काही वाटत नाही. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत.
महामंडळाच्या निर्णयाला आता राजकीय रंग प्राप्त होत आहे, यातच विधानसभा असल्याने सरकार विरोधात या विषयावर विरोधक एकमुखी झाले आहेत.