आकुर्डीचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय हे पिंपरी चिंचवडचे भूषण - नाना काटे

आकुर्डी (सह्याद्री बुलेटिन ) : आकुर्डी  येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला नॅक कमिटीचा A+ दर्जा प्राप्त झाला असून हे विद्यालय संपूर्ण भारतात तिसऱ्या स्थानावर तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले आहे.त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडला या महाविद्यालयाचा अभिमान  वाटतो,असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहराचे विरोधी पक्ष नेते, नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला नॅक कमिटीचा A+ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नाना काटे गेले होते त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.

महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ.चासकर सर, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष सौरभ काटे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Review