पिंपरी चिंचवड येथील भीमसृष्टीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) : पिंपरी चिंचवड येथील  बहुचर्चित आणि बहू प्रतिक्षीत भीमसृष्टीचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते  उदघाटन करण्यात आले .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव,आमदार गौतम चाबुकस्वार,स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका गीता मंचरकर आदी मान्यवर उपस्तित होते.

पिंपरी चिंचवड येथील भीमसृष्टीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र जनमानसात पोहचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आंबेडकर चौकात भव्य भीमसृष्टी उभारण्याचा संकल्प केला होता,पण अनेक कारणांनी या कार्यक्रमाला विलंब होत होता, शिवाय अनेकदा याचे उदघाटन लांबणीवर पडले होते ,अखेर शेवटी रामदास आठवले यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडले.

Review