जेष्ठ नागरिकांनी केले रहाटणी पिंपळे सौदागर येथील कॉक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) : पिंपळे सौदागर येथील रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्लु .टी पद्धतीने कॉक्रेटीकरण कामाचे भूमिपुजन आज दि.१२ सप्टेबर २०१९ रोजी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
या भूमिपूजन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितलताई नाना काटे, सुदामआपा काटे, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, माउली हांडे, हभप विलासभाऊ काटे, पोपट जगताप, अर्जुन काटे,सुर्यकांत काटे, राजू हांडे,अजय माकनीकर, बाळासाहेब भुंडे, संदीपआबा काटे, पिंपळे सौदागर विठ्ठल रुक्मिणी वारकरी सस्थेचे अध्यक्ष संदेश काटे ( पाटील ), सुभाष वाणी, अॅड. प्रसन्न लोखंडे, सागर भिसे, पंकज काटे, उत्तम काटे तसेच यावेळी पिंपळे सौदागर मधील ग्रामस्त, जेष्ट नागरिक व शिवशंभो सेवा मंडळाचे व विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्तीत होते

हा रस्ता यु.टी.डब्लु .टी पद्धतीने स्मार्ट सिटी सूचनेनुसार बनवण्यात येणार आहे. हे काम रहाटणी शिवाजी चौक ते महादेव मंदिर १८ मीटर रुंद व महादेव मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत ३० मीटर रुंदीचे असून याची लांबी ८५० मीटर इतकी आहे. याचा अंदाजित खर्च ८ कोटी रुपये इतका आहे.
हे काम मे.पी.सी.सी.इन्फ्रा.प्रा.लि. हि कंपनी करणार असून नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.