बांधकाम कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार - आमदार जगताप यांचे कृतिशील वचन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) : कामगारांसाठी निर्मित विविध सरकारी योजना राबविणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे यासाठी कार्यरत असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी वडिलांचे वर्षश्राद्ध व पितृ पंधरवडा याचे औचित्य साधून, अटल आहार योजने अंतर्गत  ७००० बांधकाम कामगारांना "बांधकाम कामगार सेनेच्या' माध्यमातून  मध्यान्ह भोजन दिले आहे. तसेच हि योजना कायम चालू ठेवण्याचा निर्धारहि व्यक्त केला आहे. 

हा कार्यक्रम बुधवार दि. १८ रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान कामगार नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ घेण्यात आला. 

यावेळी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे, सतीश भांडेकर, दीपक म्हेत्रे, सचिन गुंजाळ आदी मान्यवर उपस्तित होते. 

बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी चालू आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळावा यासाठी कामगार जागृती अभियानही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाने, अध्यक्ष जयंत शिंदे आणि कामगार संघटना राबवत आहे. 

Review