रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन च्या वतीने र्विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि एन आय आई शैक्षणिक साहित्य वाटप
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन ) - रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाखेमध्ये रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांचे तर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अभ्यास विषयक मार्गदर्शन व पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींच्या साठी सकाळ एन आय ई किट वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब, पिंपरीचे उपाध्यक्ष सारंग माताडे, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, आदर्श शिक्षक वेंकट देशपांडे, सोपान वाघमारे तसेच अशोक शिंदे, रुपाली शिंदे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका संगीता पडवळ आणि पर्यवेक्षिका उज्वला पाटील यांनी केले, यानंतर वेंकट देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून मराठी इंग्रजी संस्कृत विषयांचे अभ्यास विषयक मार्गदर्शन विविध उदाहरणे देऊन केले.
तसेच अशोक शिंदे यांनी देखील आजच्या स्पर्धेच्या युगात कशी जीवन घडण करावी याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सारंग माताडे यांनी विद्यार्थिनींना सकारात्मक राहून नवनवीन तंत्र आत्मसात करावीत, आत्मविश्वास व चिकाटी बाळगावी, असा अनमोल सल्ला दिला. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष भालेकर यांनी आभार व्यक्त केले.