पालिकेच्या आशीर्वादामुळे रस्त्यांचे झाले स्विमिंग पूल, निवडणुकीच्या नादात रस्ते गेले खड्यात...

पिंपरी : शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था, थोडासा पाऊस झाला तरी साठणारे पाणी, सत्ताधारी आणि विरोधक यांचे साटेलोटे, राजकीय वातावरण यामुळे रस्त्यांचे स्विमिंग पूल झाले आहेत, प्रत्येक भागात हेच चित्र आहे. यामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतेच शिवाय परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. साथीच्या विविध आजारांना आमंत्रण मिळते. 

रस्ते हे प्रवासासाठी असतात, पण त्याची जर अशी तळी झाली तर नागरिकांनी करायचे काय? 
ज्या नगरसेवकांना जनतेने निवडून दिले त्यांनीतरी पुढाकार घेतला पाहिजे. संपूर्ण पावसाळा गेला पण लोकप्रतिनिधी प्रेक्षक बनून पाहत होते आणि पहात आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. हि माफक अपेक्षा आहे. 

Review