तानाजी सावंत यांच्या गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू


सोलापूर(सह्याद्री बुलेटिन): सोलापूरातील बार्शीजवळील शेलगाव होळे परिसरात तानाजी शिवसेनेचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवलं आहे. यामध्ये त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला . तेथील संतप्त जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 

श्याम होळे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली . तानाजी सावंत सध्या मुंबईमध्ये आहेत. गाडीमध्ये त्यांचे नातेवाईक होते.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात कोणाला समजू नये म्हणून तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची नंबर प्लेट काढून ठेवली. पोलिसांनी घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Review