“मॉडर्न महाविद्यालयामध्ये दिमाखदार हिंदी मास समारंभ व राष्ट्रीय हिंदी निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरण”

पुणे(सह्याद्री बुलेटीन-प्रविण डोळस ) : दि. ०१ ऑक्टोबर २०१९हिंदी मासाच्या निमित्ताने हिंदी विभागातर्फे सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे पुरस्कार वितरण देखील या अत्यंत दिमाखदार कार्यक्रमामध्ये पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह सौ. प्रा. ज्योत्स्ना एकबोटेआणि हिंदी लेखक, कवी, समीक्षक प्रमुख वक्ता डॉ.सुनील केशव देवधर, प्रायोजक श्री. दिलीप वाडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, उपप्राचार्या डॉ. अमृता ओक आणि हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रेरणा उबाळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
हिंदी मास समारोहाचे प्रमुख वक्ते डॉ. सुनीलदेवधर यांनी युवा पिढीच्या आत्माविश्वासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाबरोबरच पुस्तकांचे, चांगल्या विचारांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.यशस्वी होण्यासाठी प्रयत्न, विचार आणि इच्छाशक्ती महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची एक राष्ट्रभाषा असणे आज आवश्यक असल्याचे त्यांनी आपले मत मांडले.उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. देवधर यांच्याशी मुक्त संवाद साधला.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी हिंदी मास समारंभाचे  उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्याच्या पर्यावरणपूरक आणि संस्कारपूर्ण नवीन अशा परंपरेची स्तुती केली.त्यांनी राष्ट्रीय हिंदी निबंध स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की संपूर्ण भारतभरातून २७०पेक्षा अधिक निबंध येणे म्हणजे हिंदी विभागाचे मोठे यशआहे.मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी हिंदी विभागामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची वैशिष्ट्ये सांगितली.तसेच हिंदी विभागामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून एम.ए. हिंदी साहित्य पाठ्यक्रमसुरु झाल्याची माहिती उपस्थितांना दिली.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रायोजक श्री.दिलीप वाडेकर आणि उपप्राचार्या डॉ. अमृता ओकयांनी हिंदी विभागाला अनेक शुभेच्छा दिल्या. 
हिंदी विभाग प्रमुख डॉ. प्रेरणा उबाळे यांनी राष्ट्रीय हिंदी निबंध स्पर्धा आणि हिंदी मास समारंभाचे आयोजन केले होते.पदवी आणि पदव्युत्तर विभागासाठी आयोजित या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून -  राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ इत्यादी हिंदी व हिंदीतर राज्यांमधून निबंधप्राप्त झाले.पदवी विभागातून अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या पौर्णिमा खंडाळे व पदव्युत्तर- संशोधन विभागामध्येम. गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा येथील कु. रेखा वर्मा हिने प्रथम पुरस्कार पटकावला.या स्पर्धेच्या परीक्षणाचे कार्य प्रा. नीला महाडिक यांनी पहिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रेरणा उबाळे यांनी हिंदी मास समारंभ आणि राष्ट्रीय हिंदी निबंध स्पर्धेच्या आयोजना मागील भूमिका मांडली.शालेय जीवनातच हिंदी भाषेशी आपली नाळ जोडली गेल्याचे त्यांनी सांगितले.या स्पर्धेच्या निमित्ताने आपण हिंदी विभाग आणि मॉडर्न महाविद्यालयास भारतभर पोहचवण्यात यशस्वी झाल्याचा आनंदही व्यक्त केला.
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागातील प्रा. असीर मुलाणी यांनी केले. यावेळी हिंदी विभागाचे प्रा. विनोद सूर्यवंशी, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. अंकुश वलीकर, प्रा. समाधान भडकुंबे आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Review