बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांचा अँड. मंचरकर यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी - पिंपरी न्यायालयातील बार असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीतील विजयी उमेदवार खजिनदार सागर अडागळे, आँडिटर सुजाता कुलकर्णी आणि राजेश रणपिसे यांचा सत्कार माजी अध्यक्ष अँड. सुशील मंचरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

२०१९-२० या वर्षासाठी कार्यकारणी नियुक्त झाली असून अध्यक्ष  दिनकर बारणे यांच्यासह उपाध्यक्ष अतुल अडसरे, सचिव हर्षद नढे, महिला सचिव सुजाता बिडकर, सह सचिव पूनम राऊत, खजिनदार सागर अडागळे, आँडिटर सुजाता कुलकर्णी तसेच सदस्य हरीश भोसुरे, विश्वेश्वर काळजे, अनिल पवार, अजित खराडे, राजेश रणपिसे यांचा यात समावेश आहे.

वकीलांच्या समस्या सोडविणे, मार्गदर्शन करणे, होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आणि एकत्र येऊन प्रगती करणे यां उद्देशाने निर्माण झालेल्या या संघटनात्मक शक्तीचे प्रतिनिधीत्व म्हणून नवीन कार्यकारणी कार्य करेल असा विश्वास अँड. मंचरकर यांनी व्यक्त केला.

Review