ममता ताई गायकवाड यांची अनोखी ममता, सफाई कामगारांसमवेत साजरी केली दिवाळी...
पिंपरी - प्रभागातील सफाई कर्मचारी यांचे प्रभागातील स्वच्छता व दैनंदिन आरोग्यच्या बाबतीत महत्वाचे योगदान असते व दिवाळीनिमित्त या कामगारांचे कुठेतरी कौतुक झाले पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला हवा, याच सद्भावनेतुन स्थायी समिती अध्यक्षा ममता ताई विनायक गायकवाड व मा.नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या मार्फत प्रभागातील सर्व कामगारांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले.
वाकड, पिंपळे निलख प्रभाग हा मोठा व जास्त लोकसंख्येचा आहे. या प्रभागाची जबाबदारी देखील दक्षतेने पार पाडून प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवून आपले कर्तव्य बजावणाऱ्या सर्व कर्मचारी व कामगारांचे यावेळी आभार मानण्यात आले.
यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.