महर्षी वाल्मिकी हे आधुनिक जीवनातही मार्गदर्शक - अँड. सुशील मंचरकर

 पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - महान तपस्वी महर्षी वाल्मिकी हे सकल मानव जातीसाठी मार्गदर्शक असून ते आधुनिक जीवनातही त्यांचे विचार कायम उपयोगी पडतात, असे प्रतिपादन सामाजिक   कार्यकर्ते अॕड. सुशील मंचरकर यांनी केले आहे.

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सुनिल पिवाल, अनिल शिरसवाल, सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंचरकर म्हणाले, २१व्या शतकाकडे वाटचाल करताना आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी जर महर्षी वाल्मिकी यांचा आदर्श समोर ठेवला तर वाटचाल सोपी होते.

आजचा महिला आणि   बालकल्याणाचा प्रश्न, स्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या वर हजारो वर्षापुर्वीच वाल्मिकी यांनी मार्गदर्शन केले आहे.

पाश्चात्त्य चंगळवादाकडे जाण्यापेक्षा महर्षी वाल्मिकींसारख्या विभूतींचा आदर्श घेतला तर निश्चितच देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. असेही मंचरकर म्हणाले    

Review