अखेर नगरसेविका नीता पाडाळे यांच्या प्रयत्नांना यश... काळेवाडीत पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) -  नगरसेविका नीता पाडाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून काळेवाडी, विजय नगर मधील शांती कॉलनी ए. बी. सी, सहारा कॉलनी, पवनानगर कॉलनी क्र.१ या भागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुक्रवारी नगरसेविका नीता पाडाळे यांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे.

यावेळी नगरसेवक संतोष कोकणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, पंकज मिश्रा, श्री. सूर्यवंशी यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काळेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाकडे मी पाठपुरावासुद्धा केला. अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्कालिक उपाययोजना केल्या पण आता नवीन पाइपलाइन टाकल्यामुळे हा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असे प्रतिपादन यावेळी नगरसेविका नीता पाडळे यांनी केले. 

Review