हैदराबाद बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण - चारही आरोपींचा खात्मा
मानवतेला काळिमा फासणाऱ्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केले आहे.
हि घटना (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत आणि नाइलाजाने पोलिसांना गोळीबार करावा लागला यात या चौघांचा मृत्यू झाला.
संपूर्ण देशात या घटनेमुळे आनंदाचे वातावरण आहे, तसेच पिडीतेच्या कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले आहे. बलात्काराच्या आरोपीला अशीच शिक्षा होणं गरजेचं आहे. न्यायव्यवस्थेत फाशीच्या शिक्षेला बराच कालावधी लागतो पण पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे तात्काळ न्याय मिळाला, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.