केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे बेंगळूरू येथे निधन...
बेंगळूरू येथील निवासस्थानी केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्याचबरोबर, संरक्षमंत्री निर्मला सितारामण, तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.