उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरे जाणार - संदीप देशपांडे यांचे ट्विट

राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
२ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
दि. १२ ऑक्टोबर रोजी ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु, आता संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत.

Review