नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने छठपूजेचे आयोजन

पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराशेजारील असलेल्या पवना नदीच्या घाटावर नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र असणारा छठपूजेचे आयोजन करण्यात आले.छठपूजन राष्ट्रवादीचे नेते विद्यमान नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे व विद्यमान नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक श्री.संतोष कोकणे उपस्थित होते तसेच उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे,नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे,नगरसेवक श्री.संतोष कोकणे यांचा सन्मान करण्यात आला.उत्तर भारतीय नागरिकांना छठ पूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे ब्रिजेश सिंग,दुर्गेश सिंग,श्री.राकेश गुप्ता,श्री.धनंजय सिंग,प्रकाश सिंग,अमरजित सिंग,शैलेश सिंग,दुवालप्रसाद मौर्य व शिवशंभो सेवा मंडळाचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Review