इराण-इस्रायल युद्धाचा कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम! भारताला धक्का?
इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरु झाल्याने कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
इस्रायल-इराण संघर्षामुळे कच्चे तेल भडकले! भारतावर काय होणार परिणाम?
इस्रायल आणि इराण यांच्यातील ताज्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मध्य पूर्वेत वाढत्या तणावामुळे तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मंगळवारी दोन्ही क्रूड बेंचमार्कमध्ये ५ टक्के वाढ झाली, नंतर ते सुमारे २.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. बुधवारी ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ७४.५५ डॉलरवर पोहोचला.
मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या आक्रमणात, इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. इराणने केलेली ही मोठी चूक असून, त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या तणावामुळे मध्य पूर्वेत व्यापक युद्धाची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतावर परिणाम: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतावर थेट परिणाम होणार आहे. भारत हा जगातील एक मोठा तेल आयातक आहे, आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यास, सामान्य जनतेला आर्थिक तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे जीवनाच्या इतर बाबींवरही परिणाम होऊ शकतो.
कच्च्या तेलाच्या किंमतीच्या या वाढीमुळे भारतातील महागाईत वाढ होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे नागरिकांचे आर्थिक बजेट गडबडू शकते. सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.