मणिपूरमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला, शस्त्रांसह दारुगोळा लुटला

सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्कतेचे आदेश

मणिपूरमधील उखरुलमध्‍ये जमावाने पोलिस ठाण्‍यावर हल्‍ला करुन शस्‍त्रांसह दारुगोळा लुटला. या घटनेची गंभीर दखल पोलीस दलाने घेतली आहे. राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यातील पोलीस अधीक्षकांना सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले आहेत.

मणिपूरमध्ये जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला; शस्त्रांसह दारुगोळा लुटला, सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात तणाव वाढल्याने जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करून शस्त्र आणि दारुगोळा लुटला. या घटनेची गंभीर दखल घेत, राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उखरुलमधील दोन गावांतील रहिवाशांमध्ये जमिनीच्या वादावरून तणाव निर्माण झाला होता. गांधी जयंतीनिमित्त परिसरातील हुंगपुंग गावातील विद्यार्थ्यांनी साफसफाई करत असताना, शेजारील हनफुन गावातील रहिवाशांनी त्यांना अडवले, ज्यामुळे गोळीबार झाला. या गोळीबारानंतर जमावाने थेट पोलिस ठाण्यावरच हल्ला चढवला.

हल्ल्यादरम्यान जमावाने 8 9एमएम पिस्तुल, 6 रायफल, 3 एके-47 रायफल, 2 9एमएम कार्बाइन, 1 एसएलआर, 1 स्टेन गन, 340 इन्सास राउंड, 180 AK-47 राउंड आणि 201 9एमएम पिस्तुल राउंड असे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लुटला. या घटनेनंतर पोलिसांनी सर्व जिल्ह्यांना अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील वाढत्या तणावामुळे सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
 

 

Review