Adani and Google Deal

Adani Group News : अदानी समूह आणि गुगलमध्ये मोठा करार झाला आहे. काय आहे हा करार, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अदानी समूहाने आघाडीची टेक कंपनी गुगलसोबत मोठा करार केल्याची बातमी समोर येत आहे. हा करार क्लीन एनर्जीबाबत (Clean Energy) असल्याचं समजतं आहे.

अदानी समूह आणि गुगलमध्ये मोठा करार; क्लीन एनर्जी क्षेत्रात एकत्र काम करणार

अदानी समूह आणि आघाडीची टेक कंपनी गुगलने क्लीन एनर्जी क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मोठा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून दोन्ही कंपन्या जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पातून ऊर्जा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.

हा प्रकल्प गुजरातमधील खवरा येथे सुरू होणार असून, सौर आणि पवन उर्जेच्या संकरित तंत्रज्ञानाचा वापर करून क्लीन एनर्जी तयार केली जाणार आहे. अदानी समूहाने या नव्या अक्षय ऊर्जा प्रकल्पातून गुगलला शाश्वत ऊर्जा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्रकल्प 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली. गुगलच्या वतीने सांगण्यात आले की, या करारामुळे त्यांच्या डेटा सेंटर्ससाठी शाश्वत उर्जेचा पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. अदानी समूहानेही एका निवेदनाद्वारे या कराराची सविस्तर माहिती दिली असून, हा करार भारतातील क्लीन एनर्जी क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.

या कराराद्वारे दोन्ही कंपन्या पर्यावरणपूरक उर्जेचा वापर करून भारताच्या हरित ऊर्जेच्या ध्येयात मोलाचा वाटा उचलणार आहेत.

Review