पोलिसांनीच केले ९६ लाख लंपास...

तो एक हॉस्पिटलचा मालक...
स्वतःचे पैसे घेऊन जात होता.
पोलिसांनी अडवले.
गाडीत हत्यार असल्याचा बहाणा केला.
आणि त्याच्याकडील रक्कम घेतली.
हि चित्रपटातील कथा किंवा मालिकेची स्टोरी नाही.
हे घडलंय पुण्यात...

आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर नकुल यादव, पोलीस कर्मचारी गणेश मोरे यांच्यासह अविनाश देवकर, रवींद्र सोपान अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विशाल देविदास भेंडे (वय 33, रा. पांडवनागर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.

विशाल धेंडे हे कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये चालक विशाल धेंडे हे हॉस्पिटलची रक्कंम मगरपट्टा येथे घेऊन जात असताना, त्यावेळी गाडीमध्ये हत्यार असल्याच्या बहाण्याने त्यांना थांबवून, चौघांनी संगमत करुन गाडीतील 96 लाख रुपये लुटले होते.
याप्रकरणी सहायक निरीक्षक यादव यांच्यासह चौघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावेळी पोलिसांनी गिरीधर नकुल यादव, पोलीस कर्मचारी गणेश मोरे, अविनाश देवकर, आणि रवींद्र सोपान माने यांना अटक केली होती.

शिवाजीनगर सत्र न्यायालयात याप्रकरणी चालवण्यात आलेल्या खटल्यात त्यांनी ही रक्कम लुटल्याची माहिती समोर येताच आरोपींना 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

Review