भारत बंदचे विरोधकांचे आवाहन....

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - पेट्रोल डिझेल दरवाढ आणि महागाईच्या विरोधामध्ये विरोधकांनी दहा सप्टेंबरला भारत बंद चे आयोजन केलेले आहे. यामध्ये मुख्यत्वे काँग्रेस आणि त्याचबरोबर 21 राजकीय पक्षांनी याला समर्थन दिले आहे. हा बंद सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत असेल, या बंदला महाराष्ट्रामधून शिवसेनेने सहभागी होण्याचे टाळले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र आपला अंशतः पाठिंबा जाहीर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वाढतच आहेत. देशांमध्ये महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्य नागरिकांना जेरीस आणले आहे. याला सत्ताधारी मोदी सरकारच जबाबदार आहे, यासाठी मोदी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी काँग्रेस पार्टीने या बंदचं आवाहन केलं आहे. हा बंद शांततामय मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील काही घटनांचे विश्लेषण करता अशी गोष्ट लक्षात येते की, काँग्रेसने सत्ताधारी भाजपाच्या विरोधात केलेले कोणतेही आंदोलन हे मोदी सरकारने भांडवल म्हणून वापरला आहे . नोटबंदी विरोधामध्ये काँग्रेसने केलेले आंदोलन त्याचा काहीही परिणाम नंतरच्या निवडणुकांवर ती झालेला दिसत नाही. त्याचबरोबर ते आत्ता अविश्वास ठराव यावेळी जे काही घडलं ते संपूर्ण देशाने पाहिले. यामुळे सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस किती आक्रमक आहे आणि किती गंभीर आहे हा प्रश्न निर्माण होतो. भारत बंद चे काँग्रेसने केलेल्या काँग्रेसने केलेल्या अहावनाला विरोधी पक्षातील लोकांनी तर साथ दिली आहे, पण भारतीय लोक त्याला किती साथ देतात यावर त्याचे यश अवलंबून आहे.

Review