राज ठाकरे यांना ईडीची नोटीस...

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

मनसेने मात्र हि राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हंटले आहे.

सरकारला फक्त राज ठाकरेच आठवतात. कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच का जाग आली?,” असा सवाल मनसेने केला आहे. 

हा लोकशाहीच्या गळचेपी करण्याचा प्रकार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

Review