सरकार झाले जागे दूध आंदोलन मागे...

          राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन लगेच मागे घेतले आहे.

          हा निर्णय २१ जुलैपासून लागू होणार असून, दूध संघांना आता शेतकºयांना २५ रुपये भाव द्यावा लागेल. अशी घोषणा दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत केली.


          दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलीटर ५ रुपये थेट अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरातआंदोलन केले. या काळात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले. मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूधटंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.


          या नंतर दूध उत्पादकांना सरकारने दिलेली वाढ समाधानकारक आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

 

Review