
कोफी अन्नान यांचे निधन....
संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सचीव कोफी अन्नान यांचा वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्र संघाचे सातवे सचिव होते. ते जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ या काळात राष्ट संघाचे सचिव राहिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाचे मुख्य कारण अद्याप समजले नसून लघु आजारामुळे त्यांना मृत्यू आला असल्याचे जाहीर झाले आहे. कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते आणि ते गांधीजींच्या विचाराचे होते. हे संयुक्त राष्ट संघाचे पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय सचिव होते.