मुसळधार पावसाची शक्यता...

केरळमध्ये पावसाने धुमाकुळ घातला असतानाच महाराष्ट्रातही येत्या २४ तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आॅगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Review