
आमदार राम कदम यांचा माफीनामा...
मुंबई (सह्याद्री बुलेटिन) - आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माफीनामा जाहीर केला आहे.
घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
राम कदम वक्तव्य प्रकरणावरुन भाजप सरकारचे अनेक मंत्री अडचणीत येत होते. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोन करुन राम कदम यांना माफी मागण्याची सूचना केली, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतरच, कदम यांनी एका व्हिडिओद्वारे दिलगिरी व्यक्त केली. तसेच ट्विटरवरुन आपला माफीनामा जाहीर केला आहे.