
अबब .. केवढे हे मानधन...
दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - देशात शिकवणारा शिक्षक, पोलीस, सैनिक,आणि नोकरदार या सर्वांपेक्षा जास्त कमाई हि क्रिकेटर करतात. करोडोंचा हा खेळ आहे, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळणारे मानधन तर मोठे आहेच पण, खेळाडूंना मिळणारे मानधनही काही कमी नाही. यात सर्वाधिक मानधन कर्णधार विराट कोहली घेतो, विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आणि आयसीसीच्या मॅच फी मधील अशी एकूण 1 कोटी 25 लाख 4, 964 रक्कम बीसीसीआयने दिली आहे.
विराट कोहलीचे वेतन आणि उत्पन्न
₹ 65,06,808 : दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी
₹ 30,70,456: दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मालिकेतील मॅच फी
₹ 29,27,700 : कसोटी क्रमवारीमधून आयसीसीकडून मिळणारे मानधन