शिवसेनेचा दारुण पराभव...

डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत भाजपपुरस्कृत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलचा दारुण पराभव करत सर्वच 21 उमेदवारांना विजयी केले, आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढली. शिवसेनेला या निवडणुकीत साधे खातेदेखील उघडता आले नाही.त्यांची निशाणी विमान होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने साधे टेक ऑफ सुद्धा केले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली. तर सहकाराचा व मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाचा व पारदर्शकतेचा हा विजय असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले.

Review