अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन...

प्रसिद्ध अभिनेते संतोष मयेकर यांचे मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हार्ट अटॅक आल्याने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते.
‘फू बाई फू’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या धमाल विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २००६ मध्ये 'देवाशपथ खोटे सांगेन' या मराठी चित्रपटाद्वारे संतोषने मराठी चित्रपटामंध्ये पदार्पण केले होते.
नाटकांसह मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली होती. ‘भैय्या हातपाय पसरी’ , वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका आदी नाटक, मालिकेत त्यांनी काम केले. पण ‘भैय्या हातपाय पसरी’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. अर्थ, दशक्रिया, इंडियन प्रेमाचा लफडा, एक तारा, गलगले निघाले, सातबारा कसा बदलला, सत्या सावित्री आणि सत्यवान सारख्या चित्रपटांमधून संतोष यांनी काम केले होते.

Review