.jpg)
पेट्रोल पुन्हा शतकाकडे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी तेल कंपन्यांना इंधन दर कमी करण्याबाबत विनंती केली होती. परंतु, पंतप्रधानांच्या विनंतीनंतरही कंपन्यांनी दर कमी केलेले दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोजच वाढ होत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल पुन्हा नव्वदीकडे जात आहे. त्यामुळे जनता आणखी त्रस्त झाली आहे.दिल्लीतही पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र, डिझेल २३ पैशांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२.८३ रुपये तर डिझेल ७५.६९ रुपये आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा दरही वाढत असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी केंद्र व काही राज्य सरकारांनी इंधन करकपात केली होती. परंतु, ग्राहकांचा हा आनंद अत्यंत अल्प काळ टिकला. कारण तेव्हापासून इंधन दरात दररोज वाढ होत आहे.