कर्नाटकात कमळाला धक्का...

कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी शनिवारी पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. यात सत्ताधारी काँग्रेस-जनता दल सेक्युलर चार जागांवर तर भाजपा एका जागेवर आघाडीवर आहे.
ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा आहे. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. रामनगरम विधानसभा मतदारसंघात एचडी कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी निवडणूक लढवत आहे. यात त्यांनी विजयाकडे वाटचाल केली आहे.
बल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा दीडलाख मतांनी आघाडीवर आहेत.
शिवमोगा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार आघाडीवर आहे.
मांडया लोकसभा मतदारसंघात जेडीएस उमेदवार १,१८,३३० मतांनी आघाडीवर आहे. भाजपा उमेदवाराला फक्त ७१ हजार मते मिळाली आहेत.तर जामाखांदी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.

Review