येवलेवाडी येथे गोळीबार... एक जखमी...

गणेश ज्वेलर्स या कोंढवा येथील येवलेवाडीमधील दुकानात चार जणांनी गोळीबार केला आहे. यात कामगार अमृत मेघावल या गंभीर जखमी झाला असून त्याला भारती विद्यापीठ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सोने-चांदीच्या दुकानात दुपारी चार व्यक्ती आल्या त्यांनी अमृत बरोबर चर्चा केली आणि त्यांनतर त्यातील एकाने अमृतवर गोळी झाडली. हल्लेखोर दोन दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने फरार झाले. याचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम आणि इतर अधिकारी येवलेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

Review