जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त...
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा तात्काळ प्रभावाने जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता आणि विरोधी राजकीय विचारधारेच्या पक्षांकडून स्थायी सरकार मिळण्याची शक्यता कमी असल्याने विधानसभा बरखास्त केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली. दरम्यान, पीडीपीनंतर दोन आमदार असलेल्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर पक्षांच्या १८ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यानंतर राजभवनातून शासकीय अधिसूचनेत विधानसभा बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. राज्यपालांनी विविध सूत्रांकडून उपलब्ध तथ्यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.विरोधी विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांकडून स्थायी सरकार मिळणे कठीण आहे. या आघाडीमध्ये असे पक्ष आहेत ज्यांनी विधानसभा बरखास्तीची मागणी केली होती. मागील काही वर्षांतील अनुभवांचा दाखला देत अस्पष्ट बहुमताबरोबर, जशी विधानसभेत सध्या स्थिती आहे. अशा परिस्थितीत स्थायी सरकार मिळणे अशक्य असते. असे पक्ष एकत्र येण्याचा हेतू हा जबाबदार सरकार स्थापन करण्याऐवजी केवळ सत्ता मिळवणे असतो.