
आज पासून मराठा आरक्षण लागू.....
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी, १ डिसेंबर राजपत्र जारी केले आहे. यामुळे आजपासून राज्यात १६ टक्के मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करत शिक्षण आणि नोकरीत १६ आरक्षण देण्यात आले आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शनिवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी केले आहे. यानुसार आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले आहे.