...या घटनेवर राजकारणी काय बोलतात...

संरक्षक भिंत कोसळून पुण्यात १६/१७ पेक्षा जास्त मृत्यू होतात यावर राजकीय पुढाऱ्यांनी व्यक्त केलेली मते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील - हे कोल्हापूर येथून पुण्याकडे रवाना झाले आहेत. तर याप्रकरणी बोलताना ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांना त्वरित एक समिती नेमून घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे - कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.

माजी आमदार महादेव बाबर - या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत.

आणि महापौर मुक्ता टिळक - चौकशी केउन लवकरच दोषींवर कारवाही करण्यात येईल.

Review